विणकर वसाहत,दुधडेअरी धनेगाव येथे श्रीमत भागवत कथा सप्ताहाचे आयोजन -NNL


नविन नांदेड|
हनुमान मंदिर आदर्श हातमाग विणकर सहकारी संस्था धनेगाव ता.जि. नांदेड यांच्या वतीने श्रीमद भागवत कथा व ज्ञानेशवरी पारायण सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. ०९ ते शुक्रवार दि. १५ एप्रिल २०२२ सायंकाळी ०६.०० ते रात्री ०९.०० पर्यंत, भागवताचार्य ह.भ.प. दिनानाथ महाराज इंजनगावकर ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवानगड यांच्या समधुर वाणीतुन आयोजित करण्यात आले आहे.

गेल्या ८ वर्षांपासून हभप वै.मामासाहेब मारतळेकर महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने याही वर्षी श्रीमद भागवत कथा व ज्ञानेशवरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दैनंदिन  ज्ञानेश्वरी पारायण दररोज सकाळी ७.०० ते ९.०० पारायण प्रमुख : ह.भ.प. बाबूराव महाराज बिरेवार सर्व संगीत मंडळी-आर्गन वादक-विश्वा महाराज कदम, तबला वादक - नवनाथ महाराज गुंडेकर,गायक पवन महाराज कदम हे साथसंगत देणार असुन १६ एप्रिल रोजी कलश मिरवणूक सायंकाळी ४ वाजता निघणार आहे.व हनुमान जयंती सूर्योदय समयी जन्मोत्सव १६ एप्रिल रोजी सकाळी व महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे.

 या सोहळ्याला परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  हनुमान मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष संग्राम निलपत्रेवार, उपाध्यक्ष रामदास इंदूरकर, साची8 गणेश गोणे, सहसचिव माधव गुडेवार, कोषाध्यक्ष प्रल्हाद गुजरवार, विश्वस्त बजरंग नागलवार, प्रवीण राखेवार, ज्ञानेश्वर गरूडकर, प्रभाकर पाटील शिंदे व विणकर वसाहत  गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी