उस्माननगर, माणिक भिसे| पवित्र भावनेने केलेल्या कामातच माणसाला खरे सुख व समाधान प्राप्त होते,त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मोहाची जास्त अपेक्षा न करता करता त्यातच समाधान मानावे असा मोलाचा सल्ला उस्माननगर पोलिस स्टेशनचे स.पोलिस निरीक्षक बाबासाहेब पी.थोरे यांनी पोलीस स्टेशन उस्माननगर येथे केलेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना उपदेश दिला.
श्री.बाबासाहेब पी.थोरे यांना पदोन्नती मिळून ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर गेल्यामुळे त्यांना उस्माननगर पोलिस स्टेशन व मित्र परिवार गावकऱ्यांच्या व पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, शाल श्रीफळ देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी बोलताना थोरे म्हणाले की, माणसाने कोणतेही काम करताना कामाचा दर्जा समजू नये. प्रथम आपले काम करावे कामापेक्षा माणूस मोठा नसतो. चांगले काम केलेल्या कामाची माणसाला चांगलीच पावती कधीनाकधी मिळते. जास्त मोहाची अपेक्षा न ठेवता एखादे काम केल्यास त्यास माणसाला सुख व समाधान मिळते आपण दुसऱ्या साठी काहीतरी चांगले काम केले पाहिजे अशी वृत्ती माणसाने अंगी स्वीकारली पाहिजे. यातच सर्वांचे हित व सुख दडलेले आहे. उस्माननगर च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज पर्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. यापुढेही सर्व कर्मचारी यांनी चांगले काम करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.उस्माननगर वाशीयांचे असलेले प्रेम मी कदापि विसरणार नाही असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाला पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञा.देवकते, पत्रकार सुर्यकांत मालीपाटील, गणेश लोखंडे, माणिक भिसे,लक्ष्मण कांबळे, तुकाराम वारकड, सुरेश मामा बास्टे, गंगाधर भिसे, कमलाकर शिंदे, दत्ता पाटील घोरबांड,आमिनशहा फकीर,राहूल सोनसळे,नरेश शिंदे, उध्दव पा.घोरबांड मनोज जमदाडे,तेजस भिसे, राजू सोनटक्के, होमगार्ड कर्मचारी,यांच्यासह गावातील मित्रपरिवार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीट जमदार पवार यांनी केले.आभार पोलीस कर्मचारी वाडे यांनी मानले..