मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा -NNL

नायगाव, सिल्लोड, सावंतवाडी, गुहागर, नरखेडा, जामखेड,रिसोड, फलटण पत्रकार संघ ठरले मानकरी

मुंबई।
सिल्लोड, नायगाव, सावंतवाडी, गुहागर, नरखेडा, जामखेड, रिसोड, फलटण या तालुका पत्रकार संघांची स्व. वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील प्रत्येक विभागातील एका तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त *एस.एम देशमुख* यांनी आज येथे पुरस्कारांची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात अनेक तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपत उत्तम काम करीत आहेत .. मात्र त्यांच्या कार्याची राज्य पातळीवरून फारशी कोणी दखल घेत नसल्याने पत्रकारांबद्दल एक नकारात्मक दृष्टीकोन बळावत चालला होता.. हे टाळण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारया तालुका आणि जिल्हा संघांना राज्य पातळीवर सन्मानित करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आणि त्यानुसार दरवर्षी तालुका आणि जिल्हा संघांना सन्मानित केले जात आहे.. यंदाचे पुरस्काराचे आठवे वर्ष आहे..

पुरस्कारांचे वितरण देखील ग्रामीण भागातच व्हावे असा परिषदेचा अट्टाहास आहे.. त्यानुसार २०२१ च्या आदर्श तालुका आणि जिल्हा संघ पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक ७ मे २०२२ रोजी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे होत असल्याचे एस.एम देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. २०२१ च्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या तालुका पत्रकार संघांची महसूल विभाग निहाय नावे पुढील प्रमाणे आहेत..

1) लातूर विभाग :नायगाव तालुका पत्रकार संघ जि. नांदेड
2) औरंगाबाद विभाग : सिल्लोड तालुका पत्रकार संघ, जि. औरंगाबाद
3) कोल्हापूर विभाग : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, जि. सिंधुदुर्ग
4) कोकण विभाग: गुहागर तालुका पत्रकार संघ, जिल्हा रत्नागिरी
5) नाशिक विभाग : जामखेड तालुका पत्रकार संघ जिल्हा अहमदनगर
6) पुणे विभाग : फलटण तालुका पत्रकार संघ, जिल्हा सातारा
7) अमरावती विभाग : रिसोड तालुका पत्रकार संघ, जिल्हा वाशिम
8) नागपूर विभाग : नरखेडा तालुका पत्रकार संघ, जिल्हा नागपूर.

वरील तालुका पत्रकार संघांना स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गंगाखेड येथे तालुका अध्यक्षांच्या मेळाव्यात ७ मे रोजी सन्मानित करण्यात येत आहे..
पुरस्कार प्राप्त सर्व तालुका संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणीने पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील आदिंनी केले असून परिषदेच्या वतीने आठही तालुका संघाचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी