दिलीपभाऊ ही एक व्यक्ती राहिली नसून सेवा कार्याचे विद्यापीठ बनले - प्रवीण साले -NNL


नांदेड|
सतत चारशे दिवस एखादा उपक्रम सातत्याने करण्याचे कार्य फक्त दिलीपभाऊ ठाकूरच करू शकत असल्यामुळे दिलीपभाऊ ही एक व्यक्ती राहिली नसून सेवा कार्याचे विद्यापीठ बनले असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी सेवा ही संघटन या उपक्रमाच्या विक्रमी ४०१ व्या दिवशी केले.

श्री गुरुगोविंदसिंग स्मारक शासकीय रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रात एकही दिवस खंड न पडता दररोज सेवा ही संघटन या उपक्रमांतर्गत भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या तर्फे कोरोना लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क, सैनीटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट देण्याच्या उपक्रमाला ४०१ दिवस पूर्ण होऊन आणखी एक नवीन विक्रम स्थापन झाला आहे. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड च्या वतीने ही सेवा अखंडितपणे सुरू आहे. यावेळी बोलताना प्रवीण साले पुढे म्हणाले की, कायापालट, मायेची ऊब,कृपाछत्र, भाऊचा डबा यासारखे उपक्रम सातत्याने भाजपच्या मार्फत दिलीप ठाकूर हे राबवित असल्यामुळे भाजपची जनमानसातील प्रतिमा आणखी वाढत आहे . 

विक्रमी ४०१ व्या दिवशी प्रवीण साले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी,जिल्हा चिटणीस मनोज जाधव, भाजप सक्रिय सदस्य कामाजी सरोदे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सागर जोशी, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल सहसचिव सुरेश शर्मा, कट्टर नमो भक्त अमोल कुल्थिया, नरेश आलमचंदानी यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लसीकरण देण्याची सुरुवात करत असताना भारतीय जनता पक्षाने एक सप्ताह भर सर्व लसीकरण केंद्रात मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचे आदेश सर्व भाजप पदाधिकाऱ्यांना दिले होते.भारतात अनेक  ठिकाणी हा उपक्रम आठवडाभर राबविण्यात आला. काही ठिकाणी महिनाभर सेवा ही संघटन सुरू होते. 

नांदेडमध्ये मात्र दिलीप ठाकूर ,कामाजी सरोदे,अरुणकुमार काबरा, प्रशांत पळसकर, सुरेश निल्लावार, सुरेश शर्मा, सागर जोशी, अमोल कुल्थिया यांनी परिश्रम घेऊन आतापर्यंत तीस हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सेवा पुरवली आहे.जोपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे तोपर्यंत ही सेवा नांदेडमध्ये सुरू ठेवण्यात येईल असा निर्धार दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी दिलीप ठाकूर हे घेत असलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी