नांदेड| शहरात रविवारी उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली. या निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील सहभागी भाविकांना भाजपा नेते मिलिंद देशमुख व नगरसेविका तथा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांच्या वतीने पाणी पाऊचे वाटप करण्यात आले.
तब्बल दोन वर्षानंतर रामनवमी साजरी होत असल्याने रविवारी रामनवमी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रामनवमी निमित्त गाडीपुरा ते अशोकनगर या मार्गावर भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. या भाविकानां भारतीय जनता पार्टी महानगर पदाधिकारी, कार्यकर्तेतसेच भाजपा महिला पदाधिकार्यांच्या वतीने रस्त्याच्या दुर्तफा भाविकांना पाणी पाऊच वाटप करण्यात आले. पाणी पाऊच वाटप केल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फेकलेले पाणी पाऊच गोळा देखील केले.
यावेळी भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, मिलिंद देशमुख, अनु. जाती मोर्चाचे साहेबराव गायकवाड, आशिष नेरलकर, अनिलसिंह हजारी, प्रभु कपाटे, योगेश देशमुख, स्वप्निल देशमुख, आनंद पावडे, संतोष क्षिरसागर, सुर्यकांत कदम, बालासाहेब देशमुख, बालाजी कोडगिरे, केशव रोडे, गजानन देशमुख, नगरसेवीक तथा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख, शीतल भालके, शततारका पांढरे, अनुराधा गिरम, अपर्णा चितळे, बेबीताई गुपीले, पूनमकौर धुपिया, लक्ष्मी वाघमारे, वैशाली देबडवार, सुषमा ठाकूर, लीलावती हिवराळे, तपास्विनी, महादेवी मठपती, उज्वला राणे, अर्चना देशमुख, प्रणिता कोडगिरे, उज्वला पदमावार आदीसह अनेकांची उपस्थिती होती.