इफ्तार पार्टीत दिल्या मुस्लिम बांधवाना आ.जवळगावकरांनी रमजान ईदच्या शुभेच्छा
हिमायतनगर, असद मौलाना| प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी विश्वबंधुत्व आणि शांततेचा संदेश संपूर्ण जगाला दिला होता. शांती, एकता सहजीवनाची शिकवण देणारा रमजानचा महिना अत्यंत पवित्र आहे. या दरम्यान महिन्याच्या उपवास करून अल्लाकडे मुस्लिम बांधव दुवा मागतात. आपल्या दुवा कबुल व्हाव्यात यासाठी मुस्लिम समाज बांधवानी महिन्याच्या शेवटचा दिवस रमजान उत्सव करताना आनंदाने साजरा करून हिंदू - मुस्लिम भाई - भाई व एकतेचा संदेश कायम ठेवावा असे आवाहन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.
ते रमजान महिन्यातील दि.२९ एप्रिल रोज शुक्रवारी हिमायतनगर येथील दारुल उल्लूम मस्जिदमध्ये आयोजित इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी जी.प. सदस्य सुभाष राठोड, माजी जी.प.सदस्य शे.चांदभाई, पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, माजी जी.प.सदस्य समद खान पठाण, कांग्रेस आयचे माजी तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, डॉ.प्रकाश वानखेडे, प्रकाश कोमावार, रामराव सूर्यवंशी, शहराध्यक्ष संजय माने, गजानन सूर्यवंशी, मिलिंद जन्नावार, गजानन तुप्तेवार, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, सुभाष शिंदे, परमेश्वर गोपतवाड, डॉ.गफ्फार कार्लेकर, तुकाराम मेरगेवाड, गोविंद बंडेवार, राजू पाटील पारवेकर, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी कृउबाचे माजी संचालक शे.रफिक सेठ यांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर, पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे शाल - टोपी भेट देऊन स्वागत केले. यावेळी पुढे बोलतांना आ. जवळगावकर म्हणाले कि, मुस्लिम समाज बांधवानी दिलेल्या प्रेम कधीही विसरणार नाही. मुस्लिम समाज बांधवांच्या विकास व उन्नतीसाठी सदैव तत्पर आहे. तुम्ही केवळ आवाज द्या मी तुमच्यासाठी कोणत्याही वेळी धावून येईल असे भावनिक उद्गार काढून आ.जवळगावकर यांनी उपस्थित सर्व मुस्लिम समाज बांधवाना आगामी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी ६.४० मिनिटाने इफ्तारचे सायरन वाजताच उपस्थित हिंदू - मुस्लिम बांधवानी इफ्तार पार्टीत सहभागी होऊन उपवास सोडला. यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, अ.बाखी, सादिक चाथरकर, फेरोज कुरेशी, असद मौलाना, शकील भाई, मनानं भाई, प्रवीण कोमावार, राहुल लोणे, दत्तात्रेय तीम्मापुरे, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिरणे, सचिव सोपान बोम्पीलवार, प्रकाश जैन, अनिल नाईक, यांच्यासह शहरातील शेकडो हिंदू - मुस्लिम बांधव व पत्रकार उपस्थित होते.