शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांना आवाहन
अर्धापूर, निळकंठ मदने| आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाच्या शक्ती केंद्रप्रमुखांनी शक्ती पणाला लावून जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात घेण्यासाठी कामाला लागा तसेच सत्ता ही कोणाचीही सात बारा नाही व तसे कोणी समजुही नये असे वक्तव्य भाजपाच्या तालुका आढावा बैठकीत बोलताना भाजपाचे प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय यांनी केले आहे.
अर्धापूर तालुक्यातील भाजपा शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांची बैठक दि.२८ गुरुवारी रोजी मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपाचे प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, प्रमुख उपस्थिती विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ.पुनमताई पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा संघटन मंत्री गंगाधर जोशी, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मराज देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी कामठेकर,समीर देशमुख यांची उपस्थित होती .
या बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय म्हणाले की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा शाखा तिथे बोर्ड लावून जोमाने कामाला लागून जि.प.व पं.स.भाजपाच्या ताब्यात घेऊन निवडणूका जिंकण्यासाठी शक्ती आणि युक्तीचा उपयोग करून जिल्हा परिषदेच्या गट व गण ताब्यात घेण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन उपस्थित शक्ती केंद्रप्रमुख व बुथ प्रमुखांना प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय यांनी केले आहे.
यावेळी विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे म्हणाले की राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ध्येय धोरणाला जनता वैतागली असून आगामी निवडणुकीत जनता त्यांची जागा त्यांना दाखवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे यांनी केले.यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे, भाजपा गटनेते बाबुराव लंगडे, माजी सभापती बाबुराव हेंद्रे, माजी सरपंच अशोक बुटले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन मुळे पाटील, भाजयुमोचे जिल्हाउपाध्यक्ष कृष्णा इंगोले, जिल्हा चिटणीस अमोल कपाटे, सरचिटणीस संतोष पवार,
शहराध्यक्ष विलास साबळे, तुकाराम साखरे, युवा नेते विराज देशमुख, ॲड. योगेश माटे,रमाकांत हिवराळे, सुधाकर कदम,अवधूत कदम,सरचिटणीस रामराव भालेराव,सचिन कल्याणकर, जगन कल्याणकर,ॲड. बालाजी कदम, राजेश धात्रक,माधव शिंदे, निलेश अपनगिरे,गोविंद कोकाटे, महिला मोर्चाच्या सौ.वर्षाताई बंडाळे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष महेश राजेगोरे, देविदास कल्याणकर, आनंदराव विरकर,हिरामण वाघमारे,माजी नगरसेवक शिवराज जाधव, कुश भांगे, शिवराम राजेगोरे, उपसरपंच विठ्ठल बंडाळे,अंगद मगनाळे, विश्वनाथ बंडाळे या बैठकीचे प्रास्ताविक भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन कल्याणकर व आभार रामराव भालेराव यांनी मानले. या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.