कर्जमाफी न मिळाल्याने चाथरी येथील शेतकर्यांचा आमरण उपोषणाचा इशारा -NNL


उमरखेड| महाराष्ट्र शासणाकडुन राबविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी व छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेतून अनेक शेतकर्यांना विविध कारणे सांगून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे अनेक अल्प भूधारक शेतकरी कर्जमाफी न मिळाल्याने आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी व छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकरी वगळल्या गेले आहेत. त्यामुळे या शेतकर्यांच्या घरावर शासनाने जणु तुळशीपत्र ठेवण्याचे काम केल्याचा आरोप वंचित शेतकऱ्यातून केला जात आहे. उमरखेड येथील शेतकरी शामराव देवराव लुम्दे, जयवंत संभाराव कदम, भिमराव गणपत कदम, वामन मारोती कदम, गणेश आनंदराव कदम, अशोक कामजी कदम हे शेतकरी शासनाच्या कर्जमाफीच्या दोन्ही योजनेत नाव समाविष्ठ असतांना वंचित राहिले आहेत.

त्यांना कर्जमाफी योजनेचा कुठलाही लाभ न मिळाल्याने या शेतकर्यांना शासनाच्या आडमुठी धोरणाचा चांगलाच फटका बसतांना दिसत आहे. सदरील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, यवतमाळ, उपविभागिय कार्यालय उमरखेड, तहसिलदार उमरखेड, सहाय्यक निबंधक उमरखेड तसेच पोलिस स्टेशन या ठिकाणी लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे. केवळ प्रशासनाच्या शासकिय कर्मचारी यांच्या चुकीमुळे कर्जमाफीच्या योजनाईपासून वंचित असून, शासनाने आमच्यावर केलेल्या अन्यायावर तोडगा कढुन लवकरात लवकर आमची कर्ज माफी करून न्याय द्यावा असे निवेदनात म्हंटले आहे. अन्यथा येत्या 25/4/2022रोजी लोकशाही मार्गाने यवतमाळ जिल्हा म. बॅंक शाखा चातारी या ठिकाणी अमरण उपोषणास बसणार असून, यात काही अघटित प्रकार झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे या शेतकर्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी