नांदेडच्या उपवन संरक्षण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढले - NNL


नांदेड|
उपवन संरक्षण अधिकारी नांदेड यांच्यासह वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजन व अक्षमय दुर्लक्ष्यमुळे नांदेड जिल्ह्यातील वृक्षांची तोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर तोडलेल्या लाकडचाही दिवसा ढवळ्या वाहतूक केली जात असताना त्या वाहनावर कधी कारवाई होणार...? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना भविष्यातील काही वर्षात वृक्ष तोडीमुळे महाराष्ट्राचे वाळवंट होईल असे एका भाषणात बोलून दाखवले होते. त्या पद्धतीनेच नांदेडचे उपवन संरक्षण अधिकारी यांच्यासह देगलूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे  नायगाव, देगलूर, बिलोली, लोहा ,धर्माबाद, उमरी, भोकर कंधार या तालुक्यात वृक्षांची दररोज मोठ्या प्रमाणात तोड होते आहे. अवैद्य रित्या तोडण्यात आलेल्या गहरीच्या लाकडाची नांदेडच्या वाजेगाव भागात मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना सुद्धा नांदेडचे वनपाल, अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे दिवसा ढवळ्या आयचर ,ट्रकच्या साह्याने मोठ्या प्रमाणात लाकडांची वाहतूक होत असताना सुद्धा कोणताच वनविभागाचा अधिकारी लाकडाची तस्करी करणाऱ्या लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे जनतेतुन संताप व्यक्त केला जात आहे.

निसर्ग प्रेमी जनतेने वृक्षतोड बंद करण्यात यावे म्हणून अनेक वेळा संबंधित वनविभागाला निवेदन देऊन सुद्धा निवेदन कर्त्यांची दखल न घेता दिवसा ढवळ्या वृक्ष तोडीसाठी परवानगी दिली की काय..? असा प्रश्‍न जनतेतून चर्चिला जातो आहे. या गंभीर बाबीकडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा डोळे झाक पणामुळे कोणत्याच वाहनावर अधिकारी - कर्मचारी कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. सदरचा वृक्षतोड आणि विक्रीचा गोरख धंदा लाकूड ठेकेदाराकडून अधिकार्‍यांशी हात मिळवणी करून सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, झाडे नाहीशे होत असल्याने उन्हाची तीव्रता वाढून तापमान ४५ दिगिरीपर्यंत पोचले आहे. या सर्व प्रकारास वृक्षतोड कारणीभूत असल्याने नांदेड जिल्ह्यातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लागली आहे. या अवैद्य धंद्यात अनेक मौल्यवान वृक्षांची कत्तल होत असल्याने सदरच्या तालुक्याला वाळवंटाचे स्वरूप येत असल्याचे दिसून येत आहे. 

महाराष्ट्र शासन एका बाजूने दरवर्षी लाखो रुपये खर्च करून वृक्षांची लागवड करत असते आणि दुसऱ्या बाजूने प्रशासनच लाकडांची कत्तल करण्यासाठी लाकूड ठेकेदाराला परवानगी देते. हा तर प्रशासनाचा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवा फंडा असल्याचे ही सरळ सरळ दिसते आहे. या कारभारामुळे प्रशासनाच्या दरबारात "आंधळ दळत" कुत्र पीठ खातय" अशी गत निर्माण झाली आहे. यावरून  आंधळ्याची वरात बहिर्याच्या दारात म्हणण्याची वेळ जनसामान्य माणसावर आली आहे. वृक्षतोडीमुळे होत असलेली पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी उमरी, मुखेड, भोकर, तामसा, देगलूर ,बिलोली, नायगाव, इतर तालुक्यात केली जाणारी वृक्षांची तोड थांबविण्यासाठी उपवन संरक्षण अधिकारी नांदेड यांनी लक्ष देऊन त्या त्या ठिकाणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ वृक्ष तोडीवर बंदी घालावी अश्या सूचना कराव्यात अशी रास्त अपेक्षा पर्यावरण प्रेमी जनतेतुन व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी