नांदेड| चैतन्यनगर शिवमंदीरात अखंड शिवनाम सप्ताह आणि ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा सुरू असून उद्या 2मे रोजी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे अशी माहिती शिव मंदीरसमितीचे अध्यक्ष माधवराव पटणे यांनी दिली.
राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या दिव्य प्रेरणेने तथा नांदेड महानगरातील तमाम समाज बांधवाच्या सहकार्याने अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन मि. चैत्र व. १०, रोज सोमवार दि. २५/०४/२०२२ ते वैशाख शु.२. रोज सोमवार दि. ०२/०५/२०२२ या कालावधीपर्यंत केलेले आहे. या अखंड शिवनाम सप्ताहाच्या अनुषंगाने शिवपाठ, ग्रंथराज परमरहस्य पारायण, प्रवचण, कीर्तन, व्याख्यान,भजन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विणेकरी म्हणून विठ्ठल मुकुंदा बोधने,हनमंत माशेती चौंडे,लक्ष्मण तुकाराम देशमुख यांनी सेवा बजावली.
आज 1 मे रोज रविवारी टाळ आरती किर्तन शि.भ.प. शिवकांताई पळसकर यांचे होईल. उद्या 2 मे सोमवार शि.भ.प. वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ संस्थान, वसमत नगर यांचे कीर्तन होईल व तद नंतर महाप्रसाद होणार आहे याचा लाभ शिवभक्तांनी घ्यावा असे आवाहन अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा समिती ने केले आहे.