नांदेड| नांदेड शहर व परिसरात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेत नाही, एक घटना घडल्यानंतर त्याचा तपस सुरु असताना दुसरी घटना घडते आहे. असाच प्रकार पुन्हा एकदा घडला असून, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुप्पा येथे एकाने बंदुकीतून गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आरोपीने तलवारीने युवकावर हल्ला करून जखमी करत पळ काढल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
नांदेडचे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरु केली आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेकांची धरपकड करून त्यांच्याकडून अवैध शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. काळ रात्रीला एका युवकांचा शौच्च विधीला गेल्याने अज्ञाताने खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आज दि.30 एप्रिल शनिवार दुपारी आणखी एक घटना घडली. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवाहरनगर तुप्पा येथे गोळीबारीची घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोराने गोळी झाडून पिंटु कसबे यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने नेम चुकल्याने तलवारीच्या साहाय्याने एकाला जखमी करून हल्लेखोर घटना स्थाळावरून पसार झाला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या जवाहरनगर तुप्पा भागात दिलीप पुंडलिकराव डाखोरे रा. शंभरगाव ता.लोहा याने पिंटु कसबे या युवकावर क्षुल्लक कारणावरुन गावठी पिस्तूलातून गोळी झाडली. नेम चुकल्याने पुन्हा जवळच्या तलवारीच्या साहाय्याने पिंटु कसबेच्या पायावर वार करून जखमी केले असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप डाखोरे हा एका प्रमुख गँगचा एक सदस्य आहे. घटनेची माहिती मिळताच इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर भोरे, पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड घटनास्थळी पोहचले. या प्रकरणाचा तपास सुरू असून जखमी पिंटू कसबेवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.