दहशतवादविरोधी पथकाने गस्तीदरम्यान केली कारवाई
परभणी| दहशतवाद विरोधी पथकाच्या सुरु असलेल्या गस्तीदरम्यान दोन संशयितांची चौकशी केली असता त्यांच्याकडून ७६ किलो १०० ग्रॅम गांजासह एकूण ७ लाख ८९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस पथकाने शेख अकबर शेख रजाक, अक्रम आयुब पठाण या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक जयंत मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले, पोलिस अमलदार सय्यद जाकेर, अझर पटेल, राठोड, रामकिशन काळे, भारत नलावाडे, जावेद खान, अरुण कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.