अर्धापुर, निळकंठ मदने| मा. उच्च न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे आदेशानुसार अर्धापुर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने शनिवारी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश एम.डी बिरहारी यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालत संपन्न झाली. यावेळी ४६ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले असून विविध बँकांचे थकीत कर्ज वीज वितरणचे थकीत बिल पक्षकार यांचे म्हणने ऐकून घेऊन ४८ लक्ष रुपयांची वसुली होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.
अर्धापूर विधी सेवा समितीच्या वतीने विधी सेवा समिती अध्यक्ष तथा न्या. एम डी बिरहारी यांच्या लोक अदालती मध्ये न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती यापैकी ४६ प्रकरण निकाली काढण्यात आले तर बँकांचे थकीत कर्जापोटी ४७ लक्ष ५५ हजार शंभर रुपये तडजोडीने निकाली काढण्यात आली आहे.
यावेळी पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचे प्रलंबित घरकुलांचे बांधकाम लाभार्थ्यांनी मागील वर्षभरापासून काही हप्ते घेतलेले असताना काही अडचणीमुळे कामे सुरू केले नव्हती अशा लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनास आदेश दिले व लाभार्थ्यांनी घरकुल सुरू करण्याचे यावेळी मान्य केले त्यामुळे लाभार्थ्यांना लवकरच आपल्या स्वतःच्या हक्काचे घर तयार होणार आहेत असे अनेक किरकोळ कारणासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली निघाल्याने वादी प्रतिवादी त्यांचे समाधान झाले.
त्यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर देशमुख सचिव अॅड. डी एम लोणे पॅनल सदस्य अड. डी बी दासे,अॅड ए. आर. चाऊस, अॅड. राम जोगदंड अॅड. बी एस मगरे, स्वयंसेवक सुभाष लोणे,अॅड. जी.बी पत्रे,अॅड. सचिन देशमुख,अॅड अभिजीत पांडे, अॅड. रावसाहेब देशमुख अॅड.अमोल कल्याणकर पो. कॉ. घुले एस किशोर मोहिते एस बी गजभारे, लोकन्यायालय प्रकरण यांनी निकाली काढण्यासाठी विशेष सहकार्य केले.