हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील गरीब शेतकरी कुटुंबातील संदीप शंकरराव तुंबलवाड या तरुणाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने त्याची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्याच्या यशाबद्दल खा.हेमंत पाटील, आ.माधवराव पाटील यांनी शाल श्रीफळ व पुष्पहाराने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
संदीप तुंबलवाड यांचे आईवडील अल्पभूधारक असून, कोरडवाहू शेतामध्ये काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. जेमतेम परिस्थिती असताना देखील शेतकऱ्याच्या मुलाने लहानपणीपासूनच शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. हिमायतनगर येथील जिल्हा परिषद शाळेत तसेच येथील राजा भगीरथ विद्यालयात प्राथमिक शिक्षण आणि हुजपा महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर पोलीस अधिकारी होण्यासाठी त्यांनी थेट नांदेड गाठून जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
हि वार्ता समजताच त्याचा अनेक मित्र मंडळींनी सोशल मीडियावर छायाचित्र अपलोड करून अभिनंदनाचा वर्षाव केला. त्याच्या यशाबद्दल काल दि. १३ मार्च रोजी हिंगोलीचे खासदार हेमंतभाऊ पाटील व आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी संदीपचा शाल -श्रीफळ व पुषपहाराने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनीक, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.
नंदेश्वर ताटिकोंडलवार यांचाही निवडीबद्दल झाला सन्मान
हिमायतनगर शहरातील पदंमशाली टेलरचा मुलगा ची.नंदेश्वर ताटिकोंडलवार यांने सुद्धा परीक्षा दिली होती. त्यात नंदेश्वरने सुद्धा घवघवीत यश मिळविले असूण, त्याची सेल टैक्स इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल हिंगोलीचे खासदार हेमंत भाऊ पाटील आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहाराने अभिनंदन करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.