हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा सर्व सामान्यांच्या सुचनांकरीता कृषिविभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध -NNL


मुंबई|
हळद लागवडी पासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत शेतकरी, प्रक्रीया कार तसेच निर्यातदारांना येणाऱ्या अडचणी विचारात घेता महाराष्ट्र राज्याचे हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चिती करीता शासनाला सल्ला देण्यासाठी कृषि व पदुम विभाग शासन निर्णय क्र.हसंप्र-2020/प्र.क्र.165/9अे, दि.07/09/2020 अन्वये मा.श्री. हेमंत पाटील, लोकसभा सदस्य, हिंगोली लोकसभा मतदार संघ, यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. 

या समितीद्वारे महाराष्ट्रातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रीया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा तयार करण्यात आला आहे.

 हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा सर्व सामान्यांच्या सुचनांकरीता कृषिविभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून या संबंधीत शेतकरी, संशोधक, उद्योजक, निर्यातदार, ग्राहक यांनी आपल्या सुचना phytocell@gmail.com या ईमेलवर अथवा कृषि उपसंचालक, फलोत्पादन-3, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,कृषिभवन जवळ, शिवाजीनगर, पुणे-411 005 या पत्त्यावर दि.07/03/2022 अखेर पर्यंत पोहोचतील या बेताने कृपया पाठविण्यात याव्यात.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी