उस्माननगर, माणिक भिसे| सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचालित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत दि.७ मार्च रोजी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.
मागील दोन तीन वर्षांपासून कोरोना या संसर्गजन्य रोगाने शाळा बंद करण्यात आले होते.त्यामुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित होते.सध्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.सध्या कोरानाची भिती कमी झाली आसली तरी शाळेत मुख्याध्यापक खबरदारी बाळगत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना विरंगुळा मिळावा व शिक्षक कसा आसतो , विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक म्हणून सम्यक कांबळे, सहशिक्षक सोहम सोनटक्के,रुद्रश्वर गवळी, सहशिक्षिका नंदनी पोटजळे,हर्षदा कांबळे,शेख तैसीम ,आकांक्षा कांबळे,वैशाली काळम,बशीरा पठाण,सोनसळे प्रतिक्षील,करूड उषा,शेख तैयबा , मुस्कान शेख,विद्या शामदिरे,सादीया पठाण,अनंमता तांबोळी,शिफा शेख ,अंजली जाधव, सेवक म्हणून अजय जाधव यांनी एक दिवस शाळेचा कारभार सांभाळून शाळेत दिवसभर शाळा सांभाळली.यांना मार्गदर्शन मु अ.मुख्याध्यपक राहुल सोनसळे व सर्वशिक्षक यांनी केले.विद्यार्थ्यांचे यावेळी कोतूक केले.