सॉफ्टवेअर निर्मिती करणार - क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे
मुंबई| वर्ग 3 आणि वर्ग 4 या पदांकरिता 34 खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी 12 जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या असून उवर्रित 22 जणांच्या नियुक्त्या लवकरच रद्द करण्यात येणार असून भविष्यात अशा बोगस खेळाडू प्रमाणपत्राच्या आधारे भरती होऊ नये यासाठी क्रिडा विभागामार्फत एक आज्ञावली (सॉफ्टवेअर) विकसित केली जाईल, अशी माहिती क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली.
शासन सेवेत ज्या 258 कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळवली, त्यांच्यावर पोलीस कार्यवाही करण्यात आली विभागामार्फत त्यांच्यावर एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आहे. याबाबतची पूतर्ता बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.विधान परिषद सदस्य श्रीमती मनिषा कायंदे, श्री.सदानंद खोत यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.