उस्माननगर, माणिक भिसे। कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत येथील तरुण , तडफदार, सामाजिक व राजकीय युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीअशोकराव चव्हाण यांचे विश्वासू कमलाकर नागोराव शिंदे यांची कंधार-लोहा युवक काँग्रेस विधानसभा मतदारसंघाचे युवा कार्यकर्ते शिंदे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
कमलाकर शिंदे हे उस्माननगर ता.कंधार येथील मा.उपसरपंच तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री,मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक कै.नागोराव शिंदे यांचे चिरंजीव आहेत.कै.नागोराव शिंदे हे निर्भिड व सच्चा इमानदार काॅग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तालुक्यात ओळखले जात होते.
नोव्हेंबर- डिसेंबर २०२१ मध्ये युवक कॉंग्रेसची कंधार - लोहा विधानसभा कार्यकारणी निवडणूक घेण्यात आली होती.या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून दिग्गज तरुण कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.सदरील निवडणूक ही ऑनलाईन घेण्यात आली होती.ही ऑनलाईन निवडणूक युवाकर्यकर्ते तन,मनाने परिश्रम घेतले आहे.नुकताच या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून,या निवडणुकीत उस्माननगर येथील युवा कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य कमलाकर शिंदे हे प्रंचड मताधिक्य मिळवून ते क्रमांक एकचे कमी वयातले (२४) वर्षाचे युवा कार्यकर्ते अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.कंधार तालुक्यातील लोकप्रिय माजी सभापती कै.माधवराव पांडागळे यांचे जिवलग कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.
कमलाकर शिंदे यांना १३८३ मते मिळाली आहेत.तर उपाध्यक्ष बाबासाहेब बाबर, उपाध्यक्ष अनिल दाढेल, उपाध्यक्ष गजानन कळसकर, उपाध्यक्ष स्वप्निन परोडवाड, महासचिव बालाजी कपाळे, महासचिव अशोक पाटील चिखलीकर, महासचिव अविनाश अंबटवाड, विठ्ठल टोनगे,शेहबाद शेख यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.सर्व विजयी युवा कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे.