उस्माननगर, माणिक भिसे। नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपने मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विकास कामावर विश्वास दाखवत उत्तर प्रदेशातील जनतेने दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ यांना दनदनित विजय बहूमत दिल्यामुळे व तसेच मणिपूर,गोवा, उत्तराखंड या चार राज्यांत भाजपची सत्ता आल्यामुळे भाजपा कंधार तालुका उपाध्यक्ष सुरेश बास्टे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सर्व सामान्य जनतेसाठी पंतप्रधान आवास योजना , उज्ज्वला गॅस योजना, देशातील सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडने,कोरोना काळात आतापर्यंत जनतेला मोफत धान्य वाटप , श्रमिक कामगार योजना , शेतकरी पेन्शन योजना,व जनसामान्य माणसासाठी विविध विकास कामे कामे करत असून विकास कामाच्या जोरावर चार राज्यांत भाजपला बहुमत मिळाल्यामुळे विजयाचा जल्लोष करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव भिसे, ग्रामपंचायत सदस्य रूद्र उर्फ संजय वारकड, सामाजिक कार्यकर्ता शंकरराव काळे, बालाजी आडंबे,राम वारकड, मारोती घोरबांड, संतोष सोनटक्के यांच्यासह अनेक असंख्य भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.