नांदेड| महाराष्ट्र सरकारने या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला असून केवळ पुणे - मुंबई च्या विकासाकरिता मोठा निधी ठेवला. यात मराठवाड्याच्या न्याय हक्कासाठी विशेष असे काही नसून केवळ तोंडाला पाणी पूसण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या महाआघाडीने केले आहे.
मराठवाड्याचे वाळवंटीकरण होत असून बोअरवेल साठी पाचशे ते हजार फूट खोल जावे लागत आहे. याचबरोबर उद्योग, धंद्याची कमतरता असल्यामुळे अनेक युवकांना पुणे, मुंबई, हैद्राबाद या ठिकाणी रोजगारासाठी जाण्याची नामुष्की दिवसेंदिवस वाढत आहे. अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आहे की केवळ पुणे - मुंबईचा असा प्रश्न पडत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड शहर उपाध्यक्ष अजित पाठक यांनी दिली.