राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान -NNL

रमेश पवार यांना नांदेड जिल्हा परिषदेने "जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार" देवून केले सन्मानित!

नांदेड| लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव (आ.) येथे कार्यरत असलेले उपक्रमशिल प्राथमिक पदवीधर शिक्षक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बहिशाल शिक्षण केंद्राचे व्याख्याते,मराठा सेवा संघ नांदेडचे जिल्हा सचिव, नांदेड जिल्हा बी एड कृती समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांचे शैक्षणिक व सामाजिक चळवळीतील सक्रिय योगदान पाहून आणि सतरा वर्षांच्या सेवेत त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तावाढीसाठी राबविलेले विविध शैक्षणिक उपक्रम, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या विविध तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय प्रशिक्षणात त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय काम केलेले आहे.

यासोबतच त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून सातत्याने पर्यावरण शिक्षण,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन, समाज प्रबोधन,कोरोना व्हायरस बद्दल जनजागृती, कोरोना व्हायरसाच्या थैमानातील विद्यार्थ्यांचा अभ्यास पालक आणि शिक्षकांची भूमिका, प्रेरक महामानवांच्या चरित्रावर चिकित्सक तर्कशुद्ध पध्दतीने संशोधनात्मक लेख लिहीलेले आहेत.अनेक लेखकांच्या पुस्तकांचे अभ्यासपूर्ण समीक्षण केलेले आहे.तसेच शिव,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर त्यांनी असंख्य व्याख्याने दिलेली आहेत.आज सबंध नांदेड जिल्ह्यात ते एक उत्कृष्ट निवेदक,व्याख्याते,लेखक, सुत्रसंचालक म्हणून परिचित आहेत.

यापूर्वी त्यांना तालुकास्तरीय गुरू गौरव पुरस्कार, महात्मा जोतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या रमेश पवार या शिक्षकाचे कार्य पाहून नांदेड जिल्हा परिषदेने त्यांना सन २०२० चा "जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार" दि.२७ फेब्रुवारी रोजी शहरातील कुसुम सभागृहात आयोजित केलेल्या शानदार समारंभात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,नांदेडचे पालकमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपुर्वक देवून गौरविण्यात आले. 

यावेळी गुरू गौरव पिठावर प्रमुख उपस्थिती राज्याचे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री डी. पी. सावंत,आमदार मोहनअण्णा हंबर्डे,आमदार अमरनाथ राजूरकर ,आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले,माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर ,शिक्षण सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर,जि.प.सदस्य डाॅ.मिनल पाटील खतगावकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, अध्यक्ष आनंदराव गुंडीले,माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सविता बिरगे आदींची उपस्थिती होती. 

जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार रमेश पवार यांना मिळाल्याबद्दल सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळीनी तसेच शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी