हळद-गहु चोरट्याचा शोध लावून शेतकरी नागरिकांनी पोलिसांना दिली माहिती -NNL

हळदीसह - गव्हाचा थोडा माल जप्त; अन्य मालाची विक्री झाल्याचा संशय 


हिमायतनगर|
हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात शेतीमालावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांनी टोळी सक्रिय झाली असून, या घटनेनंतर शेतकऱ्यांनी शहरातील दुकानात चौकशी करून माल विक्री करण्यासाठी आणणार्यांनी माहिती घेऊन चोरट्याचा शोध लावला आहे. एवढेच नाहीतर चोरट्यांच्या घरातून हळद व गव्हाचे पोते जप्त करून पोलिसांच्या हवाली केले आहे. मात्र चोरीला गेलेल्या मालापैकी बहुतांश माल  चोरटयांनी विक्री केल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, चोरटे मात्र फरार आहेत. पोलीस पोचण्यापूर्वी चोरटे पसार झाले असले तरी या चोरट्यांचा शोध लावून इतर चोरीच्या घटना होणार नाहीत यासाठी पोलिसांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

हिमायतनगर शिवारातील देविदास ढोणे यांच्या शेत सर्वे नंबर ११४ मधील आखाड्यावरून ७ गव्हाचे पोते आणि पिछोन्डी शिवारातील सय्यद खय्युम सय्यद नबी यांच्या शेत सर्वे नंबर ७६ मधील ७ ते ८ कुंटल हळद दि.२३ रोजी अज्ञात चोरट्यानी चोरून नेऊन पोबारा केला होता. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस शेती मालाची चोरी करणाऱ्यांचा तपास करत होते. दरम्यान काही शेतकऱ्यांनी येथील काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शहरातील हळद व गव्हाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी संपर्क केला. कोणीही व्यक्ती माल विक्रीसाठी आणल्यास तात्काळ माहिती देण्याची विनंती केली. 

काल दि.२४ रोजी हिमायतनगर तालुक्यातील पार्डी ज.येथील एक युवक हळदीचा भाव विचारण्यासाठी हिमायतनगर शहरातील बाजारपेठेत आला. त्याची वागणूक संशयास्पद असल्याने व्यापाऱ्यांनी याची माहिती फेरोज खान व संबंधित शेतकऱ्यांनी दिली. यावरून शेतकऱ्यांनी तो राहत असलेल्या गावातील घरी जाऊन विचारपूस केली असता हा माल आमचाच आहे. असे सुरुवातील सांगून आमचा तुमच्या शेतातील मालाचा काही संबन्ध नाही असे म्हणून उडवा उडवीची उत्तरे दिली. एवढेच नाहीतर शहरातील एका बडया व्यापाऱ्यांची ओळख देत त्यांना फोन करून विचारा... असा सल्लाही संशयित चोरट्यानी दिला होता. यावेळी माल चोरीला गेल्याच्या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा विचारपूस करत त्या व्यापाऱ्याने तुम्हाला चोरी करण्यास सांगितले का..? असे म्हणताच चोरटे युवक घरापासून पसार झाले. यावेळी  शेतकऱ्यांनी पोलिसाना माहिती देऊन चोरटयाची चौकशी करण्याची विनन्ती केली. आणि त्यांच्या घरात असलेल्या २ पोत्यातील हळदीचा कच्चा माल आपल्या शेतातून चोरीला गेलेला असल्याचे शेतकऱ्यांनी ओळखले. तो मुद्देमाल पोलीस ठाण्यात जप्त करून आणला.  


दुसऱ्या दिवशी दि.२५ रोजी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार अशोक सिंगणवाड व त्यांच्या सहकार्यांनी पार्डी येथील त्या नागरिकांच्या घरच्यांना आणून विचारपूस सुरु केली. दरम्यान त्यांच्या घरी गव्हाचे पोते असल्याचे समजल्यानंतर त्याच दिवशी चोरीला गेलेल्या शेतकऱ्यास घेऊन पोलिसांनी खातरजमा करून गव्हाचे तीन पोते ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या शेतकऱ्याच्या ताब्यात दिले आहेत. एकुणंच पोलिसांची कार्यकुशलता आणि शेतकरी नागरिकांच्या मदतीमुळे शेतीमालाची चोरी करणाऱ्यांचा शोध लागला असून, शेतकरी- नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून पोलिसांना मेहनत घ्यावी लागणार आहे. वृत्त लिहीपर्यंत चोरट्यांचा शोध लावून मुद्देमाल जप्त  केली प्रकारांची नोंद पोलीस डायरीत झाली नव्हती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी