"विद्यार्थ्यांनी आदर्शवादा पेक्षा वास्तववाद आकडे झुकले पाहिजे" - डॉ. ए. टी. शिंदे -NNL


हिमायतनगर।
येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत युवक शिबिर दिनांक 24 मार्च ते 30 मार्च 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन दि. 25 मार्च रोजी संपन्न झाले. 

या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम ह्या लाभल्या होत्या. तर उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. ए. टी. शिंदे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सरसम येथील सरपंच सौ काशिबाई सखाराम ठाकूर, उपसरपंच ॲड. अतुल वानखेडे, सरसम येथील युवा अभिनेता नरन देशमुख, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, सहकार्यमाधिकारी डॉ. एल.बी. डोंगरे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भोगे, तंटामुक्ती अध्यक्ष सीमा ताई गोखले, ग्रा. पं. सदस्य नामदेव मोकासवार, कपिल कांबळे आदी उपस्थित होते.
       

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व वीर हुतात्मा जयंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय कार्यक्रमाधिकारी डॉ.  शिवाजी भदरगे यांनी केले. मंचावरून प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. ए. टी. शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनो तुम्हीं जीवनामध्ये आदर्श वादापेक्षा वास्तववादाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. अशी विज्ञानविषयक सखोल माहिती त्यांनी दिली.
        
यानंतर ॲड. अतुल वानखेडे, डॉ. डी. के. कदम, तंटामुक्ती अध्यक्ष सीमा ताई, अभिनेता नरन देशमुख आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या ओजपूर्ण वाणीतून अनेक उदाहरणांसह केला.
         
कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. वसंतराव कदम यांनी केले. तर आभार रासेयो चे सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व तसेच कार्यालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम हा कोविड-19 विषयी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून घेण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी