याबाबत पुढे बोलतांना सरलाताई यांनी सांगितले की, माझे गाव हडसणी येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर 8वी ते 10 वी पर्यंत हदगांव शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे शिक्षण घेतल्यानंतर मध्यंतरी 3 वर्ष शिक्षणात खंड पडल्याने त्यांचा फळी ता.हदगाव येथील राजकुमार कदम यांच्याशी विवाह 2010 साली पार पडला. राजकुमार कदम हे पुणे जिल्ह्यातील पिरंगुट येथे खासगी कंपनीत काम करत असल्यामुळे.
लग्नानंतर ते पत्नीसह पिरंगुट येथे किरायाचा रूम मध्ये राहत होते.लग्न झाल्यानंतर राजकुमार कदम यांनी पत्नी सरला यांचे शिक्षणप्रती असलेले प्रेम पाहून त्यांनी पुढील शिक्षण घेण्यासाठी सरला यांना प्रोत्साहन दिले.यानंतर 11वी12 वी चे शिक्षण स्व:ताचा संसार सांभाळत पिरंगुट येथे पुर्ण करून. पुढील पदवी शिक्षण घेण्याकरीता शिवाजी नगर पुणे येथील ए.आय.एस.एस.
एम.एस.इंजिनियरिंग काॅलेज येथे प्रवेश घेऊन मेकॅनिकल इंजिनिअर ची पदवी प्राप्त केल्यानंतर काही काळ खासगी कंपनीत काम केले.पंरंतु त्यांचे मन खासगी कंपनीत लागत नव्हते.त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षाकडे लक्ष केंद्रित करून त्यांची तयारी करत असतांना.2017 ला सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केल होत.पण फॉर्म भरताना चुकीने भरण्यात आला.आणी सुवर्ण संधी गमवावी लागली.त्यानंतर निराश न होता.त्यांनी आपले प्रयत्न चालुच ठेवले आणी.
4 महीण्यांच्या गरोदर अवस्थेत असतांना मार्च 2020 ची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची पूर्व परीक्षा दिली.त्या नंतर कोरोना च्या प्रादुर्भावामुळे त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये 1 वर्षाच्या मुलीचा सांभाळ करत मुख्य परीक्षा दिली आणि मुलींच्या प्रवर्गातुन राज्यात मुलींमध्ये खुल्या प्रवर्गातून पहिल्या क्रमाकांने उत्तीर्ण झाल्या या यशाचे श्रेय त्यांनी पती राजकुमार कदम व आई वडीलांसह वाईट काळात साथ देणाऱ्या सर्व मित्र परिवारांना दिले.
या बाबत सरलाताई यांना,तुम्ही स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना काय मार्गदर्शन कराल ? अशा प्रश्न केला असता.त्यांनी जीवनात कितीही अडचणी आल्या तरीही जे ध्येय ठरवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच एक ना एक दिवस यशस्वी व्हाल.स्वतःशी प्रामाणिक राहून प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.