५ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू
नांदेड शहरालगत असलेल्या आणि नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढीव वस्ती लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेवर ताण येत होता. या भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हक्काचे पिण्याचे पाणी मिळावे, प्रत्येक मुलभूत सोयी-सुविधा त्यांना सहज उपलब्ध व्हावी या अनुषंगाने माधव पावडे गेल्या दहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून खा. हेमंत पाटील, आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडी बु. ग्रामपंचायतीच्या विकासासाठी माधव पावडे यांनी वरिष्ठांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठा यंत्रणेवर येणारा वाढीव ताण लक्षात घेता येथे पाणी पुरवठ्यासाठी नवीन योजना मंजूर करावी, यासाठी माधव पावडे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला होता. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे ५ कोटी १८ लाख रूपयांची नवी योजना मंजूर केली आहे.
निधी प्राप्त होताच पाणी पुरवठ्याच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. यापूर्वी गावातील रस्ते, सी.सी. रोड, स्ट्रीट लाईट, नाली बांधकाम आदी कामांसाठी वेगवेगळ्या विभागांतून माधव पावडे यांनी निधी खेचून आणला आहे. अवघ्या दहा महिन्यांच्या काळात वाडी बु.मध्ये जवळजवळ दहा कोटी रूपयांचा निधी आणून वाडी ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.
वाडीचा विकास हाच आमचा ध्यास : माधव पावडे
नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या वाडी बु. ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिका मुलभूत सोयी-सुविधा पुरवितांना या भागाचा शाश्वत विकास करणे, हाही आमचा संकल्प आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून आणि खा. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडी आणि परिसराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहू, अशी प्रतिक्रिया उपसरपंच प्रतिनिधी तथा युवासेना प्रदेश सहसचिव , सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माधव पावडे यांनी व्यक्त केली आहे.