नांदेड| समाज घडविण्यात त्याच बरोबर राष्ट्र विकासात महिलांचा पुरुषांच्या बरोबरीने वाटा असून कुटुंब विकासात तसेच संतती घडविण्यात महिलांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांनी केले आहे.
ते जागतिक दिनानिमित्य जवळ देशमुख येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशन गच्चे , आकाशवाणीचे निवेदक आनंद गोडबोले , मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ आदींची उपस्थिती होती. जि.प.प्रा.शा.जवळा येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे महिलांनी पुष्प आणि धूप पूजन केले.
जागतिक महिला दिनानिमित्त गावातील महिला सरपंच सौ.कमलबाई शिखरे , सौ.सिंधुताई पांचाळ , सौ. सुलोचना गच्चे , सुंदरबाई गोडबोले , इंदिराताई पांचाळ , सौ.मनिषा गच्चे यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संतोष अंबुलगेकर, किशन गच्चे यांनी महिला दिनाचे महत्व सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी साक्षी गच्चे हीने सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन शुभांगी गोडबोले हीने केले.