हिमायतनगरातील मुस्लिम समाज आणि मुस्लिम वार्ड विकास पासून वंचित - एस डी आमेर -NNL

काँग्रेसचे मुस्लिम नगरसेवकांनी स्वतःचाच विकास करून घेतला


हिमायतनगर|
सध्या नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, आगामी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकी मध्ये पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. मात्र त्यांना हे कळेना झाले कि, मतदार राजा आपणास पुन्हा संधी दिल कि नाही..? कारण शहरातील काँग्रेस पक्षातील काही माजी नगरसेवकांनी मागच्या निवडणुकीत मुस्लिम समाजास ओट बॅक समजून आश्वासनांचा भडीमार करून दिशाभूल करत मत मिळवली. निवडून येताच वॉर्डाचा विकासाकडे पाठ फिरवीत स्वतःचा विकास करून घेतला आहे. त्यामुळे शहरांतही अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे अनेक वार्ड विकासापासून वंचित आहेत. हे सर्व लक्षात ठेऊन येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत या नगरसेवकांना जागा दाखविण्याच्या तयारीत मतदार राजा असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते एस. डी. आमेर यांनी केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरास नगरपंचायतीचा दर्जा मिळून आज पाच वर्ष पूर्ण झाले मागील नगरपंचायतीच्या काळात काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजास आपली हक्काची ओट बँक समजून अनेक मुस्लीम वार्डात विकास कामे करण्याची मोठ-मोठी आश्वासने देऊन मुस्लिम समाजाचे मते मिळवली. पण नंतर ती विकास कामे करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे विकास दूर राहिला हे. स्वतःचाच विकास करून घेतला अशा माजी नगरसेवकांना आगामी नगरपंचायत निवडणुकीत आम्ही त्यांना जागा दाखवून देऊ असे सामाजिक कार्यकर्ते एस.डी.आमेर यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितले आहेत.

काँग्रेसचे आमदार राहून केवळ स्वतःचा विकास करून घेण्यात धन्यता मानणाऱ्यांची मुस्लिम वार्ड आणि उर्दू शाळेकड़े दुर्लक्ष केले. तसेच पानी शहरच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचे कामाची आड़ घेवून हिमायतनगर शहरातील मुस्लिम वार्डातील नविन बांधलेले रस्ते खोदून खराब केले. वास्तविक पाहता नदी पासून ते हिमायतनगर शहरा पर्यन्त अद्याप पाईप लाइनचे काम झाले नाही. शहरातील बांधण्यात एलेल्या टाकित पाणी पोहचले नासतांना देखील गावातील इतर वार्ड सोडून फ़क्त मुस्लिम वार्डतील रस्ते खोदुन येथील नागरिकांना अड़चन निर्माण केले आहे. तसेच बाजार चौक परिसरातील मुस्लिम स्मशान भूमीची अर्धवट संरक्षण भींत बांधली असल्यामुळे सदरील स्मशान भूमीत मध्ये गुरे, ढोरे, डुकरे जनावरे जावून घान करीत आहे,

परंतु या बाबीकड़े कोणत्याही मुस्लिम नगर सेवकाने लक्ष दिले नाही. पूर्ण कोरोना काळ गेला 2 वर्ष उलटून गेली. परन्तु मुस्लिम स्मशान भूमीत लावण्यात आलेली हाय मैक्स लाईट चालु केले नाही. वारंवार सुचना देवून हि जेनतेची कामे झाली नाही. सांगितल्या नंतरहि कामे होत नाही, असे अनेक मुद्दे आहेत. ज्यावर कधी माजी मुस्लिम नगर सेवकांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसू शकतो. आणि जेंव्हा मोठा नुकसान होईल तेंव्हा त्यांच्या चुकीची जाणीव होईल, त्यामुळे येणाऱ्या नगरपंचायत निवडणूकमध्ये काँगेसला आणि काँग्रेसचे मुस्लिम नगरसेवकाला नगरपंचयतीत दाखल सुद्धा नाहीं होउ देणार नाही. अशी शपथ हिमायतनगरचे मुस्लिम समाजाला घेण्याची गरज असल्याचेही आमेर यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी