नांदेड लाईव्हच्या वृत्ताची दखल घेऊन दिले होते पत्र
हिमायतनगर| शहरातील वार्ड क्र १ मधील विज रोहित्र जळाल्याने गेल्या महिन्याभरापासून नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. हि बाब खासदार हेमंत पाटिल यांच्या लक्षात आनुन देताच लगेचच महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून रोहित्र बसवुन विज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने नागरीकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत असलेल्या शहरातील वार्ड क्रमांक १ शंकर नगर मधिल विज रोहित्र जळाल्याने एक महिण्या पासुन येथिल रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. याबाबत अनेकदा महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र अभियंत्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नागरिकांना अडचणीत सोडून दिले होते. त्यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी आणि जागरूक युवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी डीपीचा प्रश्न पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिला. तात्काळ डीपी बसला नाहीतर आम्हाला नाईलाजाने महावितरण आणि नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा इशारा दिला होता.
खासदार हेमंत पाटिल यांचे विज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्र मिळताच अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय गंभीर स्वरूपाचा असल्याने लगेचच विजेचा प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या लेखी सुचना हिमायतनगर येथील अधिकाऱ्यास दि. ३ गुरूवारी केल्या. आज दि. ४ शुक्रवारी रोहित्र बसवुन विज पुरवठा सुरळीत झाल्याने या भागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, भटकंती थांबणार आहे.