नांदेड। मराठी भाषेचा उदय संस्कृत च्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोली भाषेपासून झाला असे मानले जाते. तेव्हापासून मराठी भाषेचा विकास होत गेला असून इतर भाषेचे ज्ञान चांगल्या प्रकारे अवगत करण्यासाठी मराठी भाषा बोलली पाहिजे,लिहिली पाहिजे,अवगत केली पाहिजे तरच इतर भाषेचे चांगल्या प्रकारे ज्ञान अवगत होईल असे प्रतिपादन दीपक नगर, तरोडा (बु.) नांदेड येथील श्री निकेतन माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यशवंत थोरात यांनी दिनांक 02 मार्च रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी केले. तत्पूर्वी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक यशवंत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा शिक्षिका सौ. सोनकांबळे कांचन यांनी मराठी दिनाचे प्रास्ताविक केले तर रणविर दांडेकर यांनी मराठी दिना विषयी मार्गदर्शन करताना मराठीचा उगम विकास आणि आपत्तीमध्ये कशी ती टिकून राहिली हे सांगितले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. सूत्रसंचालन उमाकांत शेट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी माळेगावे यांनी मानले कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.