कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आ.डॉ.राठोड यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन-NNL

तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना आदिवासी कोळी समाज बांधवांच्या विविध मागण्यासाठी निवेदन


मुखेड, रणजित जामखेडकर।
आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार समाज संघटनेच्या वतीने दिनांक २१ मार्च रोजी अनुसुचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य तथा मुखेड कंधार विधानसभेचे आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या घरा समोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार असून त्या बाबतचे निवेदन तहसीलदार , पोलिस निरीक्षक आणी आमदार डॉ. तुषार राठोड यांना देण्यात आले.

आमदार डॉ. तुषार राठोड यांना मुखेड तालुक्यात खावटी अनुदान योजनेचे वाटप करण्यात यावे, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी पत्र द्यावे, उपविभागीय अधिकारी यांना समाजाचे जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कळवावे, वैधता समितीला मतदार संघात अनुसूचित जमातीचे नागरिक राहतात असे कळविणे अश्या अनेक मागण्या संदर्भात वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते परंतु आ. डॉ. तुषार राठोड यांनी समाजाला न्याय दिली नसल्याने आदिवासी कोळी समाजाची पिळवणूक होते आहे.


यामुळे तालुक्यातील कोळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी मुखेड / कंधार विधानसभा मतदारसंघातील कोळी समाज बांधवांच्या वतीने येत्या २१ मार्च रोजी वसंतनगर कोटग्याळ येथील आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदनाद्वारे सांगितले आहे.

यावेळी उपस्थित आदिवासी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते मारोती मामा मामीलवाड, हणमंत मामा वाडीकर, संजय यलमवाड , शिवाजी गेडेवाड, डॉ. विठ्ठल शेटवाड , माधव पूनवाड , नागोराव शेटवाड , लक्ष्मण नागरवाड , साईनाथभाऊ बोईनवाड, सचिन मंदेवाड, व्यंकट यरमुलवाड, बालाजी मंगेवाड, बालाजी गोजेवाड, बाबुराव बोईनवाड, बालाजी मदेवाड, दत्ता बदेवाड, हणमंत बोईनवाड, गजानन मामीलवाड, नागनाथ रोडेवाड, माणिक पुटवाड, संजय पिल्लेवाड, पिराजी नालापल्ले, लालबा पिल्लेवाड, शोभा यरपुरवाड, मथुराबाई पुठ्ठेवाड, कैलास कुंटेवाड, किशन बोईनवाड, गंगाधर बोईनवाड, गणेश पिटलेवाड, अंतेश्वर कोल्हेवाड, संजय गेडेवाड, सतीश गुडमेवाड, दत्ता बोईनवाड, माधव बिल्लेवाड, संदिप पिल्लेवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

दि.२१ मार्च रोजी आ.डॉ.तुषार राठोड यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार असून मुखेड कंधार तालुक्यातील सर्व अनुसूचित जमातीतील कोळी समाज, मनेरवारलू समाज बांधवांनी , सहकुटुंब ,सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन सकल कोळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी