महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक व्यक्त करताना विस्तार अधिकारी अरुण घोडसे यांनी देशमुख यांच्या प्रशासकीय वाटचालीतील ठळक मुद्दे अधोरेखित केले.
जिल्हा परिषदेच्या कल्याणकारी योजना तळागाळातील शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यात देशमुख यांचा मोलाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार सभापती सूर्यतळे यांनी यावेळी व्यक्त केले. देशमुख यांच्या कारकिर्दीतील ग्रामविकास ते कृषी क्षेत्रातील तालुक्याचा प्रवास अविस्मरणीय राहील अशा शब्दात गटविकास अधिकारी यांनी त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे राज्य प्रतिनिधी शिवकुमार देशमुख यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.
याप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी ससाने, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, हंबर्डे, कक्ष अधिकारी वंदना देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी अब्राहम वर्गिस, वृत्त प्रतिनिधी संजय कोलते, ग्रामविकास अधिकारी गिरधारी मोळके, शिवाजी गिराम, तालुकाध्यक्ष भास्कर कळणे, प्रभाकर सोगे यांसह तालुक्यातील शेतकरी, विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी अनुप श्रीवास्तव, संजय श्रीनेवार, एकनाथ कदम, अधीक्षक मधुकर पाटील, नरेंद्र जोशी, ज्ञानेश्वर वानखेडे, सुनील नागरगोजे आदींनी परिश्रम घेतले.