महा शिवरात्री निमित्य काळेश्वर मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन नरसिंग हंबर्डे यांच्या जिजाई रक्तपेढि च्या वतीने करण्यात आले होते ,या शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण काळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्य मंत्री डी .पी.सावंत, दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे ,जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते उपस्थितीत रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिबीरात 72 रक्त दात्यांनी रक्तदान केले ,यावेळी महापौर जयश्री पावडे, सभापती संगीता डक, ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी राजू हंबर्डे ,धारोजी हंबर्डे, साहेबराव हंबर्डे ,शंकरराव हंबर्डे ,उत्तमराव हंबर्डे ,बालाजीराव हंबर्डे, श्रीनिवास मोरे ,दत्ता गिरी जयसिंग हंबर्डे व इतर मान्यवर यांची उपस्थिती होती, रक्त संकलनासाठी जिजाई रक्त पिढीचे शिवप्रसाद कुबडे अप्पा, शिवराज सूर्यवंशी ,मदतनीस प्रकाश हलगे, मोहन वाघमारे, दैवशाला खंदारे ,यांनी परिश्रम घेतले