बाभुळगाव येथील शेतकरी रावसाहेब पांचाळ यांनी नापिकीमुळे शेतातील झाडाला गळफास घेऊन ५ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती, कुटूंबातील परिस्थिती सामान्य असल्याने शासनाने आर्थिक मदत मिळावी यासाठी संरपच पुंडलिक मस्के पाटील व गावकऱ्यांनी नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांच्यी भेट घेऊन मदत देण्याची मागणी केली.
२८ फेब्रुवारी रोजी तहसिलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाघाळा तलाठी सजा मंगेश वांगीकर यांनी राष्ट्रीय कुंटूंब आर्थिक साहयक योजने अंतर्गत मधील मदतीचा धनादेश पांचाळ कुटुंबाकडे सुपुर्द केला यावेळी संरपच पुंडलिक मस्के पाटील,धनेगावाचे संरपच गंगाधर शिंदे पाटील,तूकाराम पांचाळ,दता पाटील मस्के यांच्या सह गावकरी ऊपसिथीत होते.