महाशिवरात्री निमित्य राज्याचे बांधकाम तथा नांदेड चे पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांनी १ मार्च रोजी काळेश्वर येथे दर्शन घेतले यावेळी काळेशवर ट्रस्टचे अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती . दि १मार्च रोजी महाशिवरात्री निमित्ताने काळेशवर मंदिर विष्णुपुरी येथे राज्याचे बांधकाम तथा नांदेड चे पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रथम काळेश्वराचे दर्शन घेतले यानंतर आरती करण्यात आली. काळेश्वर ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रतिनिधी राजू हंबर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले ,कि कोविड काळानंतर पहिल्यांदाच सर्वाना एकत्र येण्याचा योग्य आला असून जे पाणी जलाशयात आहे त्यावर जल मार्गाने काळेशवर ते मार्कंड प्रवास करणे सोपे होईल व परिसरातील विकास कामासाठी २५० कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला असून यात माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा पुतळा यासह विविध विकास कामे जलद गतीने होतील असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी राज्यमंत्री डी .पी. सावंत ,दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे महापौर जयश्री पावडे , मनपा महिला बालकल्याण सभापती संगीता डक ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर , विश्वस्त धारोजी हंबर्डे , माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे ,शंकरराव हंबर्डे ,उत्तमराव हंबर्डे ,बालाजीराव हंबर्डे, श्रीनिवास मोरे ,दत्ता गिरी ,नरसिंग हंबर्डे, जयसिंग हंबर्डे ,यांच्या सह मान्यवराची उपस्थिती होती. महाशिवरात्री निमित्ताने सकाळ पासूनच काळेशवर विष्णुपुरी येथे भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.