हिमायतनगरातील अर्धवट रस्त्याच्या कामासाठी काँग्रेस आक्रमक -NNL

अन्यथा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली ५ तारखेला रास्तारोको  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातून जाणाऱ्या धानोडा ते भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यापासून संबंधित ठेकेदाराने अर्धवट ठेऊन जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सर्वसामांन्य नागरिकांचे बेहाल होत असून, धुळीमुळे अनेक अपघात होऊन नागरिक आजारी पडत आहे. यास जबाबदार केवळ ठेकादरचा नाकर्तेपणा कारणीभूत असून, तात्काळ अर्धवट ठेवलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून वाहनधारक, शेतकरी, व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वखाली पक्षाच्या वतीने तहसीलदार गायकवाड यांना निवेदन देऊन केली आहे.


अन्यथा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर शहरातील कमानीजवळ ५ मार्च रोजी रास्ता रोको करून कुंभकर्णी झोपेतील केंद्र सरकार आणि संबंधित ठेकेदाराला जागृत करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर काँग्रेस तालुकाध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


माहुर - किनवट - हिमायतनगर - भोकर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए च्या कामात ठेकेदाराने मागील काही महिन्यापासून दिरंगाई चालविली आहे. त्यामुळे वाहनधारक, नागरीक, शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. एवढेच नाहीतर आता धुळीमुळे अनेकांची कुचंबणा केली आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यां सोडवण्या करिता आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाने आक्रमक भुमिका घेतली असुन,त्यांच्या एका शिष्टमंडळाने तहसीलदार डी.एन.गायकवाड यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. तसेच तात्काळ काम सुरु करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन दिला आहे, यावेळी पत्रकारांची सुध्दा उपस्थिती होती.

हिमायतनगर तालुक्यातील रेल्वे गेट ते संत मेरी माता सेंटरपर्यंतच्या रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन ठेकेदारे ३ महिन्यापासून पळ काढला आहे. रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन रस्त्यावर मुरूम टाकून ठेवल्यामुळे वाहनांची वर्दळ होताच प्रचंड धूळ उडत असून, यामुळे व्यापाऱ्यांसह सर्व सामान्य नागरिक अडचणीत आला आहे. रास्ता ओबढधोबड असल्यामुळे वाहनधारकांना मुख्यमार्गावर प्रवास करताना अनेक वाहन घसरून पडून अपघात होत आहेत. या कारणामुळे मुख्य मार्गावरील वाहनाशी टक्कर होऊन एखादी अप्रिय घटना घटीत होऊ शकते. त्यामुळे कॉग्रेस पक्षाने अर्धवट रस्त्याची समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. 

या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, शहराध्यक्ष संजय माने, माजी जी.प.सदस्य सुभाष दादा राठोड, खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, नाजीमचे संचालक गणेशराव शिंदे, माजी नगराध्यक्ष अखिल भाई,  माजी तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, सोसायटीचे संचालक सुभाष शिंदे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोजखान युसूफखान, प्रवीण कोमावार, किशन नरवाडे, राजेश्वर झरेवाड, कानबा पोपलवार, अमोल जोगदंड, परमेश्वर भोयर, गजानन गायके, मोहन ठाकरे, योगेश चालकावर, अरविंद वानखेडे, शे.रहीम पटेल, बब्बू पाटील, किरण माने, बद्रीनाथ बुरकुले, अरविंद वानखेडे, पंडित ढोणे आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

माहुर - किनवट - हिमायतनगर - भोकर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए च्या कामात ठेकेदाराने मागील काही महिन्यापासून दिरंगाई चालविली आहे. हिमायतनगर शहराजवळ तर अक्षरश कळस गाठून ठेकेदाराने रस्त्यावर मुरूम टाकून काम थांबविले आहे. त्यामुळे वाहने येताच मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे, यामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक शेतकरी, वाहनधारक आणि व्यापारी वैतागले आहेत. असे असताना याकडे संबंधित अभियंता देखील लक्ष द्यायला तयार नाहीत अश्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या ठेकेदारावर कार्यवाही व्हावी. आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेबानी रस्त्याच्या कामात निकृष्टपणा आणून अर्धव कामे ठेवणारी ठेकेदारावर आपण केलेल्या वक्तव्यानुसार कार्यवाहीचा बडगा उगारला आणि अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून जनतेची हेळसांड थांबवावी अशी संतापजनक मागणी यावेळी प्रतिक्रिया देताना परमेश्वर गोपतवाड, कानबा पोपलवार, योगेश चिलकावार यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने यांनी व्यक्त केली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी