१ मार्च रोजी सकाळी महाशिवरात्री निमित्ताने शिव मंदिर देवस्थान येथे मुख्य पूजारी पिंटू महाराज यांच्या मंत्रोपचाराने विश्वस्त सदस्य सुदर्शन कांचनगिरे व परिवाराने महाअभिषेक पुजा केली या वेळी शिवभक्त सेवा मंडळ चे उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख व सदस्य यांच्यी उपस्थिती होती.
सकाळ पासूनच सिडको हडको परिसरातील महिला भाविक भक्तांसह युवक , युवती व जेष्ठ नागरिक यांच्यी मोठ्या प्रमाणात गर्दी होती,दिवसभर शिवनाम पठाण, शिवलीलामृत पारायण यासह धार्मिक विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सायंकाळी सात वाजता मंदिर देवस्थान प्रांगणात १००८ दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले होते यावेळी महिला भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती त्यानंतर महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आले. शिवभक्त सेवा मंडळ पदाधिकारी वैजनाथ देशमुख, भगवान बारसे,पटने,गाढे अप्पा,शिराळे आप्पा, सरस्वती कांचनगिरे, शोभा कांचनगिरे,सौ.लकडे यांच्या सह पदाधिकारी यांनी सहकार्य केले.