नांदेड| दारिद्य्र निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नुकतेच समाजरत्न गौरव पुरस्काराचे वितरण स्व. दादारावजी वैद्य सभागृह, नांदेड येथे झाले. या कार्यक्रमाप्रसंगी सत्काराला उत्तर देताना पुरस्कार प्राप्त व प्रमुख पाहुणे रणजितसिंघ कामठेकर म्हणाले की, आर्थिक दारिद्य्रासोबत वैचारिक दारिद्य्राचे निर्मुलन होणे गरजेचे आहे. ते काम दानिस अनेक वर्षापासून करीत आहे. त्यांच्या कार्यासोबत राज्यातील सर्वच समाजरत्नांनी सहभागी होऊन काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
नांदेड येथे दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भव्यदिव्य स्वरुपात पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दानिस प्रमुख मा. रमेश भालेराव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. गुरुनाथराव कुरुडे, सौ. वर्षाताई जमदाडे, डॉ. हंसराज वैद्य, चंद्रकांत पार्डीकर, प्राचार्य पी.एन. भालेराव, दत्तात्रय कुरुडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रा. प्रविण गोटे, नामदेव ढोंबरे, मनिष डांगे, अशोकराव परळीकर, दत्तात्रय कुरुडे, प्रा. पुंडलीक वाघमारे, नरेश शास्त्री, उत्तम गायकवाड, डॉ. शितल भालके, निखील इंगोले, माधव अटकोरे, इंजि. प्रशांत इंगोले, भाऊसाहेब घोडे, अरविंद इंगळे, सौ. तारामती जायभाये, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, रंगनाथ भालेराव, अनुराधा कपाळे, संगीता डहाळे, क्रांती हाटकर, संगीता स्वामी, प्रा. सौ. उषाताई सरोदे, सौ. बेबीताई घोडे आदी समाजरत्नांचा दानिसच्यावतीने सन्मानपूर्वक गौरवपत्र, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन दानिस महिला राज्य अध्यक्षा सौ. छायाताई भालेराव यांनी केले होते तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निरंजन तपासकर यांनी केले तर आभार प्रा. ज्योती कपाळे यांनी मानून भव्यदिव्य पुरस्कार सोहळा मोठा आनंदात पार पडला असे दानिस नांदेड शहराध्यक्ष रवि बांगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.