मुलांच्या परवानगी शिवाय झालेला फेरफार रद्द करा, मागणीसाठी आमरण उपोषण-NNL

तलाठ्यांच्या कारभारामुळे आमचे कुटुंब उघड्यावर आल्याचा आरोप


हिमायतनगर।
तालुक्यातील सिरंजनी येथील एका शेतकऱ्यांचा मुलांची संमती न घेताच तलाठ्यानी मुलींच्या नावे चुकीचा फेरफार केला असून  तो फेरफार तात्काळ रद्द करण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी  सिरंजनी येथील गंगाधर कोंडबा मोरे  ,  रवि  कोंडबा मोरे  यांनी आपल्या मुलां बाळासह  तहसील  कार्यालयासमोर दि.  ०२  बुधवारी  आमरण उपोषण सुरू केले आहे. 

तालूका दंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गंगाधर  कोंडबा मोरे, रवि कोंडबा मोरे  यांनी म्हटले आहे की, सिरंजनी शिवारात माझे वडील कोंडबा गंगाराम  मोरे  यांच्या नांवे शेत  सर्वे न.   (२५ ) क्षेत्र  ०१  हेक्टर २१ आर शेत जमीन आहे. व तसेच माझ्या वडीलांचे वय आता जवळपास ७० वर्ष पुर्ण झालेले आहे. माझ्या वडिलांसोबत माझ्या  तिन  बहिणी  व माझे मेव्हणे व तसेच तलाठी श्री जाधव  यांनी  संगनमत करूण माझ्या वडीलांच्या नावावरील शेत जमीन तलाठी श्री जाधव यांनी  हजारो रूपयांची रक्कम घेवून व तसेच आम्ही दोन भाऊ नामे  गंगाधर कोंडबा मोरे व रवि कोंडबा मोरे वारस ह्यायात असतांना आम्हाला विश्वासात न घेता व तसेच आमची संमती न घेता फेरफार केला असून  फेरफार करताना  तलाठी श्री जाधव यांनी गावातील सुचना फलकावर  जाहीर नोटीस लावली नाही. 

प्रकटन काढले नाही. व तसेच  ज्यांच्या पंचनाम्यात सह्या आहेत.  त्यांना समोर घेऊन स्वाक्षऱ्या घेतल्या नाहीत.  बनावट सह्या च्या अधारे फेरफार करून हजारो रूपये लाच घेऊन  तलाठी श्री जाधव यांनी आम्हाला आमच्या हक्का पासून वंचित ठेवले आहे. ज्यांनी  पंचनाम्यावर सह्या घेतल्या त्यांनी तलाठी महोदयांना आमच्या सह्या नाहीत,  असेही पत्र देऊन कळविले आहे. तलाठी श्री जाधव पैश्या साठी काहिही करायला तयार होतात.   

तलाठी श्री जाधव यांनीच आम्हास उघड्यावर आणले असून आमचे कुटूंब ही उघड्यावर आले आहे. असे त्यांनी निवेदनात नमूद केले असून  तलाठी श्री जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. व तसेच सदरचा फेरफार रद्द करण्यात यावा.  यासह अन्य मागण्या करण्यात आल्या असून न्याय मिळे पर्यंत आमच्या लेकरा बाळासह उपोषण चालूच ठेवणार असल्याचे उपोषण कर्ते गंगाधर मोरे व रवि मोरे यांनी सांगीतले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी