विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे आयोजन
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अनेक विनोदवीर योग्य व्यासपीठ न मिळाल्यामुळे आपली कला सादर करण्यापासून वंचित राहतात. त्यांना एक नवीन व्यासपीठ देण्याचा उद्देश आहे. जास्तीत जास्त विनोद वीरांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि आपल्या कलेचे सादरीकरण करावे आणि "नवा बाकेराव" हा किताब पटकवावा हा मुख्य हेतू आहे.
स्पर्धा १७ आणि १८ मे २०२२ रोजी पुण्यात घेतली जाणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ मे २०२२ ही आहे.
सांघिक प्रथम पारितषिक २० हजार,
सांघिक द्वितीय पारितषिक १५ हजार,
सांघिक तृतीय पारितोषिक १० हजार
सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक ५ हजार अशी पारितोषिके आहेत. त्याचप्रमाणे 'नवा बाकेराव 'हा वैयक्तिक पुरस्कार आणि इतर वैयक्तिक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतून होणाऱ्या आर्थिक लाभाचा विनियोग अडचणीत असलेल्या कलाकारांना मैत्रीचा हात देण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क असून ते १ हजार रुपये इतके आहे.
प्रवेश अर्जासाठी अभिजित इनामदार- 9326 98 98 35 विजय पटवर्धन -98222 52 912 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रसिकांच्या मनावर राज्य करणारी बतावणी
वगनाट्यामध्ये गण, गवळण, बतावणी, वग आणि लावणी सादर करून रसिकांचं मनसोक्त मनोरंजन केलं जातं. विच्छा माझी पुरी करा, गाढवाचं लग्न, कथा अकलेच्या कांद्याची, बेलभंडार, लवंगी मिरची कोल्हापूरची अशी अनेक वगनाट्य गाजली आणि त्यांनी रसिकांच्या मनावर गारूड केलं.
दादू इंदुरीकर, दादा कोंडके, निळू फुले, वसंत शिंदे, रामनगरकर, विजय कदम, सतीश तारे यांच्यापासून संतोष पवार, केदार शिंदे, दिगंबर नाईक, प्रियदर्शन जाधव अशा अनेक दिग्गज कलाकारांनी वगनाट्य आणि विशेषतः त्यातली बतावणी लोकप्रिय केली. ह्या दिग्गज कलाकारांच्या मधलं अग्रणी नाव म्हणजे, "प्रकाश इनामदार". अनेक नाटके, चित्रपट आणि मालिका गाजवून त्यांनी रसिकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलं. "गाढवाचं लग्न" ह्या राष्ट्रपती पदक विजेते ब्युटीफुल वग नाट्य सादर करून त्याचे त्यांनी अडीच हजाराच्या वर प्रयोग सादर केले आणि रसिकांची भरभरून दाद मिळवली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, "विनोद मूर्ती प्रकाश इनामदार स्मृती करंडक राज्यस्तरीय बतावणी स्पर्धा" आयोजित करण्याचे, "विजय पटवर्धन फाऊंडेशन"ने ठरवले आहे.