नांदेड| व्यक्तिमत्व विकासामध्ये संवाद कौशल्याची भूमिकाही महत्त्वपूर्ण असते संवाद साधण्यात तरबेज असणारा व्यक्ती आपली छाप प्रभावीपणे पाडत असतो. असे मत प्रा.दीपा बियाणी यांनी व्यक्त केले. त्या कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुजामपेठ येथे सुरू असलेल्या सात दिवसीय विशेष युवक शिबिरात बोलत होत्या.
पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारत अभियान साठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवक शिबिर धनेगाव मुजाम पेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आयोजित बौद्धिक उद्बोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. स्मिता कोंडेवार या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुक्तरे यांनी केले.
पुढे बोलताना प्रा.दिपा बियाणी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणात वाचन केले पाहिजे. वाचनामुळे ज्ञानात भर पडून व्यक्तिमत्व विकसित होत असते. त्याचबरोबर निर्णयक्षमता, आत्मविश्वास, चिंतनशीलता या गुणांचा देखील आपण विकास केला पाहिजे. तरच आपले व्यक्तिमत्व प्रभावी होऊ शकते. या नंतर अडव्होकेट प्रियांका कैवारे यांनी महिला सुरक्षा संबंधित कायद्याची सविस्तर माहिती दिली. ज्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार,हुंडाबंदी कायदा, लिंगभेद कायदा, बाल विवाह, महिला अत्याचार, कार्यालयीन अत्याचार यासारख्या अनेक समस्यांशी संबंधित कायद्याविषयी त्यांनी माहिती दिली.
तर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नगरसेविका डॉ.अर्शिया कौसर यांनी स्त्रियांचे स्वास्थ आणि मानसिक सदृढता याविषयी माहिती दिली.ज्यामध्ये तणावमुक्त राहणे, पुरेशी झोप घेणे,सकस आहार घेणे,चालने आणि व्यायाम करणे याकडे मुली आणि महिलांनी विशेष लक्ष द्यावे असे सांगितले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ.स्मिता कोंडावार यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. पुष्पा क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा. शेख नजीर यांनी मानले.या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.उस्मान गणीसर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुकतरे, प्रा.हिना कुरेशी,प्रा.निजाम इनामदार, प्रा.सय्यद सलमान, प्रा.डॉ.सय्यद वाजिद,प्रा.तहरीन मॅडम, मोहम्मद मुजफ्फरोद्दिन(फराज),श्री.अक्षय हासेवाड, अमरीन मॅडम,म.मोहसिन, गौस खान,मोहम्मदी बेगम आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील शिबिरार्थी स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.