गृहराज्यमंत्री स्नेहनगर पोलीस वसाहतीचा मागवनार तात्काळ प्रस्ताव
नांदेड। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी स्नेहनगर पोलिस वसाहतीत पोलिसांसाठी नवीन निवासस्थाने बांधकामासाठी निधीची मागणी केली आहे. या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस अधीक्षक यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यात पोलिस निवासस्थाने बांधण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष तरतूद केली आहे. नांदेड पोलीस दलाच्या स्नेहनगर पोलीस वसाहतीमध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे. वसाहतीत जागोजागी ड्रेनेज फुटले आहेत. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी वर्षभरापूर्वीच गृहमंत्र्यांकडे पोलीस वसाहतीत निवासस्थाने बांधकामासाठी निधीची मागणी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पोलीस निवासस्थानाबाबत लक्षवेधी मांडली असता, नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी नांदेड पोलीस दलाच्या निवासस्थानाचा देखील मुद्दा उपस्थित केला आहे. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी विधानसभेत स्नेहनगर पोलीस वसाहतीतील समस्याचा विधानसभा अध्याक्षां समोर पाढा वाचून दाखवला.
पोलिस वसाहतीत घरांची पडझड झाली असून, इतर जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारे पोलिसांची निवासस्थाने बांधल्या जात आहेत. त्याच प्रकारे नांदेड पोलीस दलांसाठी देखील निवासस्थाने बांधली जावेत. यासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आपण दिलेला प्रस्ताव कुठपर्यंत आहे, त्यावर अद्याप काय कार्यवाही झाली आहे, त्याची पण माहिती घेऊ. त्याबरोबरच नांदेड पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून देखील पोलीस वसाहतीचा तात्काळ अहवाल मागू आणि त्यावर कार्यवाही करू, असे उत्तर दिले आहे.