यावेळी बाळासाहेब पावडे यांनी खा. अनिल देसाई यांचे तलवार, पुष्प गुच्छ व शाल देऊन सत्कार केला. शिवसंपर्क अभियानाचा झंजावात गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात झाला आहे. पहिल्याच दिवशी नांदेड दक्षिण – उत्तर, लोहा – कंधार, नायगाव - देगलूर - मुखेड मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा व कार्य अहवाल घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी किनवट, हदगाव, भोकर मतदारसंघातील विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन व कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले.
शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन थेट कामगार सेना जिल्हाध्यक्ष तथा पावडेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य बाळासाहेब पावडे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना सचिव तथा खा. अनिल देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बाळासाहेब पावडे यांनी कार्यालयात खा. अनिल देसाई यांचे स्वागत करून, आशीर्वाद घेतले. तसेच बाळासाहेब पावडे यांनी कामगार सेनेच्या माध्यमातून आज पर्यंत काय कार्य केले, याची पण माहिती जाणून घेतली.
यावेळी बाळासाहेब पावडे यांनी आपल्या कार्याची माहिती तसेच कार्यपुस्तिका दाखवली असता, खा. अनिल देसाई यांनी देखील बाळासाहेब पावडे यांचे कौतुक केले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव बोंढारकर, उमेश मुंडे, तालुकाप्रमुख जयवंत कदम, जि.प. सदस्य बबनराव बारसे, युवासेना प्रदेश सहसचिव माधव पावडे, शाखा प्रमुख सुरेश पावडे, रवी जाधव, प्रणव बोडखे, उद्धव पावडे, ऋषी पावडे, मनोज पावडे, कमलकिशोर पावडे, धनंजय पावडे, सोनू कल्याणकर यांच्यासह आदीजण उपस्थित होते