साहित्यिक प्रा.भगवंत क्षीरसागर यांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या _NNL

विभागीय केंद्राच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त सन्मान संपन्न


नांदेड|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे विभागीय कार्यालय नांदेडच्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून , कवी, लेखक, अनुवादक, प्रा. भगवंत क्षीरसागर यांचा साहित्यीक योगदानाबद्दल राजभाषा मराठी सन्मान करण्यात आला. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय कार्यालय नांदेडच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख, प्रा. डॉ. माधव जाधव, प्रा. महेश मोरे इत्यादी साहित्यीकांच्या उपस्थितीत , प्रज्ञा प्रतिष्ठानच्या सभागृहात हा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमात गंध कवितेचा या सदरात प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. वृषाली किन्हाळकर, कवी शिवाजी अंबूलगेकर यांनी आपल्या प्रिय कवींच्या कवितांचे अभिवाचन केले. नांदेड मधील मरठी भाषेवर आणि कवितेवर प्रेम करणारी मंडळी यावेळी उपस्थित होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे नांदेड विभागीय केंद्राचे  सचिव शिवाजी गावंडे यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके सुत्रसंचालन कवी पंडीत पाटील सर यांनी केले. तर सुधाकर अडकिने यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवाजी अंबुलगेकर,सदा वडजे,कल्पना डोंगळीकर,बापू दासरी विकास कदम,पंजाब लोमटे,दीपक बल्लाळ,आत्माराम राजेगोरे,पप्पू व्यवहारे, यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी