नांदेड| देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या अमूल्य जीवनाचे बलिदान केलेल्या महान देशभक्त, स्वातंत्र्यवीर, शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त येत्या २३ मार्चला नवी दिल्ली येथे जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली (रजि.) च्यावतीने देशभक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील संसद भवन जवळील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे जय भारत माता सेवा समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सद्गुरु श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात बुधवार दि. २३ मार्चला सकाळी १० वाजता अमर बलिदान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे.
भारत देशामध्ये राहणार्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आणि रक्ताच्या कणाकणामध्ये ‘हम भारतीय है’ हा एकच आवाज राहिला पाहिजे. जीव महत्त्वाचा नाही देश महत्त्वाचा आहे. देहपुजा करण्यापेक्षा प्रथम देश पुजला पाहिजे म्हणून समस्त देशवासीयांना शूरवीरांचे बलिदान कायम स्मरणात रहावे या मुख्य उद्देशाने हवा मल्लीनाथ महाराज यांनी देशभक्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास देशभरातील विविध राज्यातील देशभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय सदस्य सिद्धार्थ तलवारे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.