या कार्यक्रमास विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हानपुङे-पाटील , सकल मराठा समाज समन्वयक दत्ता मामा मुळे ,पोलिस निरीक्षक अजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका प्रमुख प्रियवंदा पवार, जिजाऊ ब्रिगेङच्या लताताई ढेरे, सामाजिक कार्यकर्त्या मानसी गोरे, सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला शिक्षणमहर्षी साविञीबाई फुले,व राष्ट्रमाता राजामाता जिजाऊ माँसाहेब यांच्या फोटोस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालण्यात आला.तद्नंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष रणरागिणींचा गौरव सोहळ्यात महिला पोलिस कर्मचारी यांना फेटा परिधान करुन गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपले विचार प्रकट करत उपस्थित महिला पोलिस कर्मचारी यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ह्या कार्यक्रमास विजापूर नाका पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष कर्मचारी अनिल गवसाने ,भिंगे,विशाल जाधव यांचे विशेष सहकार्य लाभल्याने त्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. चौधरी फौऊंङेशनने जागतिक महिला दिनानिमित्त दखल घेऊन विशेष सत्कार केला त्याबद्दल महिला पोलिस कर्मचारी यांनी संस्थापक अध्यक्ष चेतन चौधरी यांचे विशेष आभार प्रकट केले. कार्यक्रमाची प्रस्तावना पञकार वैभव गंगणे यांनी केली तर आभार चौधरी फौऊंङेशनचे संस्थापक अध्यक्ष चेतन चौधरी यांनी मानले.