अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील येळेगांव येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष विठ्ठलराव कपाटे हे येळेगाव येथील पांदन रस्ता वरील अतिक्रमण न काढल्यास नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर 10 मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.
अर्धापूर तालुक्यातील येळेगांव ग्रामपंचायत हद्दीतील पांदन रस्त्यावर काही लोक विनापरवाना बांधकाम करत आहेत.त्यांनी पांदन रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण केले आहे.पांदन रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे.यासाठी संतोष विठ्ठलराव कपाटे यांनी वेळोवेळी निवेदन दिले उपोषण केले.तरी पण ग्रामपंचायत प्रशासन अतिक्रमण काढण्यास तयार नाही.
त्या अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायत प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. येळेगांव पांदन रस्त्यावरील अतिक्रमण 10 मार्च पुर्वी न काढल्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा येळेगांव येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते संतोष विठ्ठलराव कपाटे यांनी दिला आहे.