श्रीमद् भागवत कथाकार ह.भ.प.शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर
उस्माननगर, माणिक भिसे| दरवर्षी प्रमाणे यंदाही उस्माननगर येथील श्री.महारुद्र कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्री.भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ३ मार्च २०२२ पासून ते १० मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.त.यानिमित्त थोर संत महात्म्याचे कीर्तन, प्रवचन,भागवत कथा होणार आहे.
या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ ते ६ काकडा आरती,स.६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण,९ ते ११ गाथा पारायण , दुपारी २ ते ५ श्री.भागवत कथा व ५ ते ६ हरिपाठ, रात्री ९ ते हरिकिर्तन नंतर जागर.आसे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दि.३ मार्च रोज गुरुवारी किर्तनकार ह.भ.प.गजानन महाराज खरबीकर ,दि.४ मार्च रोज शुक्रवारी ह.भ.प. त्रिंबकअप्पा नावंदेकर, दि.५ मार्च रोजी शनिवारी ह.भ.प. शंकरराव महाराज लोंढे सोनमांजरीकर,
दि.६ रोजी रविवारी ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठकर,दि.७ रोजी सोमवारी ह.भ.प. मारोतराव महाराज चव्हाण हातळेकर, दि.८ मार्च रोज मंगळवारी ह.भ.प. भारती महाराज अहमदपुर,दि.९ रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता गाथा , ज्ञानेश्वरी मिरवणूक सोहळा गावातील प्रमुख रस्त्यांनी निघेल.रात्री ९ वा.ह.भ.प.पंढरी महाराज हाडोळीकर दि.१० मार्च गुरुवारी रोजी सकाळी काल्याचे किर्तन ह.भ.प.पंढरीमहाराज हाडोळीकर यांचे होईल.त्यानंतर महाप्रसाद होईल.तर उस्माननगर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळींनी केले आहे.