अरदास, अखंड पाठ,पूजा अर्चनाचे आयोजन
गुरू महाराजांची आपल्या बाजूला कृपा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यासाठी हि राजकीय मंडळी गुरुजींपुढे नतमस्तक होताना दिसत आहे. पंजाब मध्ये राजकारना बरोबर समाज कारण आणि धार्मिक श्रद्धेला तितकेच महत्व दिले जाते. गुरुजी चा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वच जण नतमस्तक होतात. त्याचाच एक भाग म्हणून हि मंडळी हुजूर साहिब तख्त चे दर्शन करिता नांदेड च्या गुरुंगरीत दाखल झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री सरदार प्रकाशसिंघ बादल सुद्धा नांदेड ला आले होते, दर्शन करून नतमस्तक झाले होते. 10 मार्च रोजी पंजाब सह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे, निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंजाब मधील सर्वच पक्षाचे उमेदवार गुरु साहिब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाच तख्ताचे दर्शन करत आहेत.
फत्तेगड साहिब सरहिंद विधानसभा मतदार संघातील अकाली दलाचे उमेदवार सरदार जगदीपसिंघ चिमा हे सचखंड गुरुद्वारा मध्ये नतमस्तक होऊन बुधवारी चंदीगड ला रवाना झाले, नानक साई फाऊंडेशन कडे त्यांच्या स्वागताची जबाबदारी होती, त्यांचे टीम नानक साई ने जोरदार असे स्वागत केले, शुभेच्छा दिल्या. हरगोबिंदपूर घुमान विधानसभा मतदार संघातील अकाली दलाचे उमेदवार सरदार राजनबीर सिंघ घुमान हे गुरुद्वारा दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांचे नानक साई फाऊंडेशन तर्फे आज गुरुवारी सकाळी 9 वाजता लंगर साहिब गुरुद्वारा मध्ये संत बाबा नरेंद्रसिंघ जी आणि संत बाबा बलविंदरसिंघ जी यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी हि माहिती दिली.
"यांच्या तर्फे शुभेच्छा व्यक्त" नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,सेक्रेटरी सौ.प्रफुल्लाताई बोकारे,डॉ गजानन देवकर, सरदार टेजिंदरसिंघ मककर, सरदार नरेंद्रसिंघ दिल्लीवाले, हरिदास भट्टड,जी नागय्या,सुभाष बलेवार,भाई जगबिरसिंग तोरणे पानिपत,राणा रणबीर सिंघ खोकर,तुलसीदास भुसेवार, बालाजी शेळके,जनार्धनराव पिन्नलवार विनायक पाथरकर,सुधाकरराव पिलगुंडे, सय्यद कलीम,चरण सिंघ पवार, बळीराम पवार, प्रल्हाद भालेराव,प्रकाश अजमेरा, सुनिल देशमुख,धनंजय उमरीकर, श्रेयसकुमार बोकारे,भाऊराव मोरे नायगाव,आयुब पठाण, श्याम कोकाटे पाटील,जयप्रकाश नागला, राजेश मुखेडकर, गंगाधर पांचाळ, पुंडलिक बेलकर,दयानंद बसवंते तुकाराम कोटूरवार,गोविंदराव राऊत, शंकर सिंग ठाकूर, मारोती शिकारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत