नांदेड| युक्रेनच्या खारकीव्हमध्ये बॉम्ब हल्ले करण्यात आले. मंगळवारी सकाळी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
हा विद्यार्थी फक्त २१ वर्षांचा होता आणि तो वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाला होता. ही बातमी कळताच जवळा येथील चिमुकल्यांनी नवीन यास दोन मिनिटे श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, मारोती चक्रधर आदींची उपस्थिती होती.
भारतातून शिक्षणासाठी दरवर्षी शेकडो विद्यार्थी रशियात शिकण्यासाठी जातात. त्याला भारतात मान्यता दिली जाते. परंतु सध्या रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाचा भडका उडाला आहे. यामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी विमानाने सुखरुप आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पण अशातच भारतासाठी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. रशियाने युक्रेनच्या खारकीव्हमध्ये केलेल्या बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हे वृत्त कळताच जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सर्वांनी एकत्र येत युद्ध थांबून सर्वत्र शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना केली.