अनरिचेबल " नावाच्या लघुपटाची फ्रान्स या देशात " बेस्ट मोबाईल शॉर्ट फिल्म " म्हणून निवड-NNL

पहिलाच विदेशी फेस्टिव्हल आणि पहिलाच विदेशी पुरस्कार..

कंधार येथील युवकांनी तयार केलेल्या अनरिचेबल या लघुपटाला प्रथम पुरस्काराचा गौरव.

कंधार, सचिन मोरे। कंधार तालुक्यातील व्यावसायिक आणि युवा दिग्दर्शक शुभम नागोराव केंद्रे यांचा " अनरिचेबल " नावाच्या लघुपटाला फ्रान्स या देशात " बेस्ट मोबाईल शॉर्ट फिल्म "म्हणून निवड करण्यात आली असून येत्या ७ मे रोजी एका विशेष कार्यक्रमात गौरव सोहळा आयोजित केला असल्याचे इमेल द्वारे कळवण्यात आले आहे .या लघुपटाची खास बाब म्हणजे हा एका शेतकऱ्यांच्या मुलाच्या आयुष्याची व्यथा मांडणारा १४ मिनीट ९ सेकंदाचा लघुपट असून याचे चित्रीकरण कंधार तालुक्यातील गोलेगाव , शेकापूर शिवारात पूर्ण करण्यात आले आहे.  आणि त्यातुन आपल्याला एक सकारात्मक शेवट देतो . ही शॉर्ट फिल्म अवघ्या ८०० रु च्या निर्मितीमध्ये झाली आहे हे याची विषेश गोष्ट आहे . 

याची निर्मिती शुभम जाधव यानी केली तर दिग्दर्शन  आणि लेखन शुभम नागोराव केंद्रे यांनी केले आहे . शुभम केंद्रे यांचं फिल्म आणि लिखानाबाबतचे कोर्सेस व शिक्षण झाले असल्याने एक सिनेमाचा विद्यार्थी म्हणून ही मराठवाड्यातील लोकांसाठी अभिमानाची बाब आहे.प्रमुख साहाय्य म्हणून अविनाश पाटील कळकेकर , मंगेश गवळे आणि सागर मंगनाळे यांनी  यासाठी सहकार्य केले असून विशेष म्हणजे यात एकही संवाद नसून पूर्णपणे दृश्याच्या माध्यमातून हा लघुपट तयार करण्यात आला आहे . ही बाब नक्कीच फक्त कंधार तालुक्यासाठीच न्हवे तर महाराष्ट्र सह भारत देशसाठी अभिमानाची बाब आहे .

यापूर्वी याच लघुपटाने पाच पुरस्कार पटकावले असून पुरस्काराची घोडदौड चालूच असल्याचे दिग्दर्शक शुभम केंद्रे यांनी सांगितले.  त्यांच्या यशाबद्दल   संदिप सोनकांबळे , मिना सूर्यवंशी , यश सोनकांबळे , करण पवळे ,  तसेच कंधार तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी भेटलेल्या पुरस्कार बद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी